क्लासिफाइड्स
1. एखादी क्लासिफाइड जाहिरात कशी पोस्ट करायची?
2. मी माझी क्लासिफाइड जाहिरात कोठे पोस्ट करु?
3. माझी क्लासिफाइड जाहिरात कशी संपादित करता येईल किंवा हटवता येईल?
4. माझी क्लासिफाइड जाहिरात किती काळ सक्रिय राहिल?
5. माझी क्लासिफाइड जाहिरात प्रकाशित होण्याबाबतचा पुष्टीकरण ईमेल मला मिळाला नाही तर काय होते?
6. एखादी स्वारस्य असलेली क्लासिफाइड जाहिरात कशी सुरक्षित करायची?
7. मला माझी क्लासिफाइड जाहिरात कशी पाहता येईल?
8. माझी क्लासिफाइड जाहिरात का हटवण्यात आली?
9. मी एखाद्या क्लासिफाइड जाहिरातीस कसे प्रत्युत्तर देऊ?
10. मी वेबदुनिया क्लासिफाइड वर क्लासिफाइड्स जाहिराती कशी शोधू?
11. जेव्हा एखादी नवीन गोष्ट पोस्ट होते तेव्हा त्या बाबतचा ईमेल सतर्क मला कसा मिळवता येईल?
12. माझ्या क्लासिफाइड जाहिरातीसाठी मी एखादा फोटो कसा काय पोस्ट करू / अद्ययावत करु / जोडू?
13. माझी जाहिरात लगेचच पोस्ट होईल का?
14. माझ्या शोध मापदंडांशी जुळणार्या जाहिरातींसाठी मला अधिसूचना देण्यात येईल काय?
15. मी पासवर्ड विसरलो आहे. मी काय करू?
16. मला माझ्या जाहिरातीसाठी प्रतिसाद का मिळत नाही आहे?
17. जर माझ्या शहराचे नाव वेबदुनिया क्लासिफाइडवर दिसत नसेल तर काय करावे?
सामान्य
1. मी वेबदुनियावर कोठे नोंदणी करु?
2. मला माझी इंटरफेस भाषा कशी बदलता येईल?
3. वेबदुनिया क्लासिफाइड्सच्या नियम व अटी काय आहेत?
4. मी गैरवर्तन, स्पॅम, किंवा लैंगिक सामुग्रीची तक्रार कशी नोंदवू?
5. जर कुणी मला पोस्ट करुन त्रास देत असेल तर मी काय केले पाहिजे?
क्लासिफाइड्स
1. एखादी क्लासिफाइड जाहिरात कशी पोस्ट करायची? 
वेबदुनिया क्लासिफाइड्स मुख पृष्ठावर जाहिरात पोस्ट करा टॅब वर क्लिक करा, ज्यात आपल्याला आपली क्लासिफाइड जाहिरात पोस्ट करायची आहे तो देश, राज्य, शहर, श्रेणी आणि उपश्रेणी निवडा, आपल्या जाहिरातीचे शीर्षक आणि वर्णन प्रविष्ट करा (लाल तारांकन चिन्ह असलेली फील्ड्स अनिवार्य आहेत). आपण आपल्या श्रेणीनुसार पुढील तपशील देऊ शकता, आणि त्यानंतर विंडोच्या तळाशी असलेले "जाहिरात पोस्ट करा" क्लिक करा. आपली जाहिरात पाहाण्यासाठी "जाहिरात पूर्वावलोकन" क्लिक करा.
आपण आपली जाहिरात पोस्ट करण्यापूर्वी, आपल्याकडे वेबदुनिया क्लासिफाइड लॉगिन आयडी असणे गरजेचे आहे.
जाहिरात पोस्ट केल्यावर, आपण जे मेल खाते नोंदणीच्या वेळी प्रदान केले होते, त्या खात्यात आपल्याला पुष्टीकरण ईमेल मिळतो.
बस इतकेच. आपली क्लासिफाइड जाहिरात काही मिनिटातच वेबदुनिया क्लासिफाइड्स पोर्टल वर दिसेल आणि 365 दिवस तेथे दिसत राहिल.
2. मी माझी क्लासिफाइड जाहिरात कोठे पोस्ट करु? 
जाहिरात योग्य श्रेणीमध्ये पोस्ट केलेली असावी. आपली जाहिरात पोस्ट करण्यासाठी योग्य श्रेणी निवडा अन्यथा आपली जाहिरात समूहाद्वारे "अयोग्य श्रेणीबद्ध" चिन्हांकित केली जाऊ शकेल/कदाचित करण्यात येईल.
जर आपल्याला श्रेणी बद्दल काही समस्या असेल तर, कृपया आमच्याशी या पत्त्यावर संपर्क साधा: classifieds@webdunia.net
3. माझी क्लासिफाइड जाहिरात कशी संपादित करता येईल किंवा हटवता येईल?
आपली जाहिरात संपादित करण्यासाठी / हटवण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
चरण1: आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरुन वेबदुनिया क्लासिफाइड्स वर लॉगिन करा.
चरण2: जाहिराती व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
चरण3: जी जाहिरात आपल्याला पाहायची आहे/ संपादित करायची आहे/हटवायची आहे ती निवडा आणि कारवाई स्तंभातून कारवाई निवडून घ्या.
चरण4: तेथील लिंक्स क्लिक करा, आपल्याला आपल्या क्लासिफा्इड्स जाहिराती पाहाता येतील, संपादित करता येतील, किंवा हटवता येतील
4. माझी क्लासिफाइड जाहिरात किती काळ सक्रिय राहिल? 
आपली क्लासिफाइड जाहिरात पुष्टीकरणानंतर 365 दिवस सक्रिय राहिल. 365 दिवसांनतर, आपल्याला नोंदणी आयडी वर एक ईमेल मिळेल, ज्यात आपल्या क्लासिफाइड जाहिरातीचे नूतनीकरण करण्याबाबत विचारले जाईल. आपल्याला क्लासिफाइड जाहिरातीचे नूतनीकरण करायचे असेल तर आपल्याला त्या मेल मधील लिंक क्लिक करावी लागेल, अन्यथा मेलकडे दूर्लक्ष करा.
5. माझी क्लासिफाइड जाहिरात प्रकाशित होण्याबाबतचा पुष्टीकरण ईमेल मला मिळाला नाही तर काय होते? 
जर आपल्याला पुष्टीकरण मेल मिळाला नाही तर, कृपया आपण नोंदणीच्या वेळी जो ईमेल आयडी दिला होता त्याच ईमेल आयडीने आपण लॉगिन करत असल्याची खात्री करा, हे तेच स्थान आहे जेथे आपल्याला क्लासिफाइड सक्रिय करण्यासाठी मेल मिळेल.
6. एखादी स्वारस्य असलेली क्लासिफाइड जाहिरात कशी सुरक्षित करायची? 
स्वारस्य असलेली क्लासिफाइड जाहिरात संग्रहित करण्यासाठी प्रत्येक क्लासिफाइड जाहिरातीच्या वर असणार्या "पसंतीत सुरक्षित करा" लिंक वर क्लिक करा.
आपण आपल्या पसंतीच्या यादीत कितीही जाहिराती सुरक्षित करू शकता.
7. मला माझी क्लासिफाइड जाहिरात कशी पाहता येईल? 
आपली क्लासिफाइड जाहिरात पाहाण्याचे दोन मार्ग आहेत:
पुन्हा तो ईमेल क्लिक करा, जो आम्ही आपली क्लसिफाइड जाहिरात पोस्ट केल्याची पुष्टी करण्यासाठी पाठवला आहे.
वेबदुनिया क्लासिफाइड्स पोर्टलवर दिसणार्या आपल्या डॅशबोर्ड वर डावीकडे असलेल्या "माझ्या जाहिराती" > "जाहिराती व्यवस्थापित करा" क्लिक करा.
येथे आपण आपल्या जाहिराती पाहू शकता/संपादित करू शकता/हटवू शकता.
8. माझी क्लासिफाइड जाहिरात का हटवण्यात आली? 
आपली क्लासिफाइड जाहिरात/जाहिराती खालील कारणांमुळे हटवण्यात येऊ शकतात:
• प्रकाशनाचा 365 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यास.
• क्लासिफाइड जाहिरात गैरवर्तनाची तक्रार या रुपात चिन्हांकित झाल्याने समुदायाने ती हटवली आहे.
9. मी एखाद्या क्लासिफाइड जाहिरातीस कसे प्रत्युत्तर देऊ? 
प्रत्येक क्लासिफाइड जाहिरातीच्या उजव्या बाजूस जाहिरातदाराशी संपर्क साधा फील्ड असते. आपण आपले नाव, ईमेल आयडी, संपर्कासाठी क्रमांक आणि संदेश त्या जाहिरातीच्या मालकाला पाठवू शकता. ज्या व्यक्तीसाठी आपण लिहित आहात ती व्यक्ति आपण दिलेला तपशील पाहू शकेल.
10. मी वेबदुनिया क्लासिफाइड वर क्लासिफाइड्स जाहिराती कशी शोधू? 
निवडलेल्या श्रेणीतील क्लासिफाइड्स जाहिराती आपल्या पसंतीची फील्ड्स निवडून आपल्याला शोधाव्या लागतील. शोध फील्ड्स प्रत्येक श्रेणीनुसार बदलतील. आपण वेबदुनिया क्लसिफाइड्स पोर्टल वर आपला आयडी नोंदवण्याआधी किंवा नोंदवल्यानंतर जाहिराती शोधू शकता. आपल्या आवश्यकतांचा शोध विविध फील्ड्समधील पर्याय निवडून फिल्टर करा आणि शोध क्लिक करा.
11. जेव्हा एखादी नवीन गोष्ट पोस्ट होते तेव्हा त्या बाबतचा ईमेल सतर्क मला कसा मिळवता येईल? 
एकदा आपण वेबदुनिया क्लासिफाइड्सवर नोंदणी केली की आपल्या डॅशबोर्डच्या डाव्या उपखंडातील "माझे सतर्क" > "नवीन सतर्क सेट करा" मधून आपण सतर्क सेट करू शकता. असे करणे निवडक/निवडून घेतलेल्या फील्ड्सच्या क्लासिफाइड जाहिराती शोधते आणि हा शोध मापदंड आपण सतर्क व्यवस्थापित करा पर्यायामध्ये (नवीन सतर्क फील्ड सेट करा’’ च्या लगेचच खाली उपलब्ध आहे) सुरक्षित करा, येथे आपण एखादा सतर्क संपादित करू शकता / हटवू शकता. जुळणारी कोणतीही नवीन जाहिरात पोस्ट झाल्यानंतर आपल्याला एक अधिसूचना ईमेल मिळेल.
12. माझ्या क्लासिफाइड जाहिरातीसाठी मी एखादा फोटो कसा काय पोस्ट करू / अद्ययावत करु / जोडू?
• वेबदुनिया क्लासिफाइड पोर्टलवर आपल्या "ईमेल आयडी" आणि "पासवर्ड" सह लॉगिन करा.
• "माझ्या जाहिराती" >"जाहिराती व्यवस्थापित करा" वर क्लिक करा.
• "संपादित करा" लिंक क्लिक करा आणि "प्रतिमा अपलोड करा" पर्याय वापरून प्रतिमा अपलोड करा.
आपण अपलोड केलेली प्रतिमा पोर्टल वर प्रदर्शित करण्यापूर्वी तिची वेबदुनिया क्लासिफाइड्स प्रशासकाकडून पडताळणी करण्यात येईल.
13. माझी जाहिरात लगेचच पोस्ट होईल का?
होय, प्रत्येक पोस्ट केलेली/ तयार केलेली जाहिरात तात्काळ पोर्टलवर दिसू लागते. परंतु प्रतिमा असलेली जाहिरात (जर असेल तर) वेबदुनिया क्लासिफाइड्स प्रशासकाकडून प्रमाणिकृत करणे/ तिची पडताळणी करणे गरजेचे आहे.
14. माझ्या शोध मापदंडांशी जुळणार्या जाहिरातींसाठी मला अधिसूचना देण्यात येईल काय?
होय. जर सतर्क सेट केलेला असेल तर, आपल्या शोध मापदंडांशी जुळणारी शोध श्रेणी आपल्या स्क्रीनवर दिसेल.
15. मी पासवर्ड विसरलो आहे किंवा मला माझा पासवर्ड रीसेट करायचा आहे. मी काय करू?
• वेबदुनिया क्लासिफाइड्सला भेट द्या
•
लॉगिन लिंक क्लिक करा.
•
"पासवर्ड विसरला?" लिंक वर क्लिक करा.
• आपला ईमेल आयडी आणि पडताळणी कोड प्रविष्ट करा.
आपल्या ईमेल आयडी वर पासवर्ड बदलल्याच्या पुष्टीकरणाचा मेल पाठवण्यात येईल. आपल्या मेल आयडी वर लॉगिन करा आणि आपला पासवर्ड पुनर्प्राप्त/रीसेट करण्यासाठी आपल्या खात्यातून पुष्टीकरण स्थिती पाठवा. आपला पासवर्ड आपल्या मेल आयडी वर मेल करण्यात येईल.
16. मला माझ्या जाहिरातीसाठी प्रतिसाद का मिळत नाही आहे?
जाहिरातीला प्रतिसाद न मिळण्याचे सर्वात सामान्य कारण अयोग्य संपर्क तपशील/ दिलेली माहिती हे असते. आपण माझे प्रोफाइल विभागात दिलेला संपर्क तपशील विशेषत: आपण दिलेला ईमेल पत्ता/मोबाइल क्रमांक तपासून पाहाण्याचा सल्ला आम्ही देतो. आपण जाहिरात योग्य श्रेणीत पोस्ट केलेली असल्याची देखील खात्री करुन घ्या.
17. जर माझ्या शहराचे नाव वेबदुनिया क्लासिफाइडवर दिसत नसेल तर काय करावे?
कृपया नवीन शहरे किंवा स्थाने classifieds@webdunia.net येथे सुचवा. जर आपण नवीन स्थान सुचवत असाल तर कृपया तेथील एखादी मोठी खूण आवश्य सांगा, जेणे करुन आम्ही ते स्थान लवकरात लवकर समाविष्ट करू शकू.
सामान्य
1. मी वेबदुनियावर कोठे नोंदणी करु? 
वेबदुनिया क्लासिफाइड्स वर नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. (पोर्टलवर हे स्थान निर्दिष्ट असले पाहिजे).
आपण स्वत:च्या किंवा इतरांच्या क्लासिफाइड जाहिराती नोंदणी न करता शोधू शकाल, परंतु जाहिरात पोस्ट करण्यासाठी आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. "साइन इन" लिंक वर क्लिक करा आणि तेथील निर्देशांचे अनुसरण करा.
जर आपल्याकडे ईमेल आयडी नसेल तर आपण वेबदुनिया क्लासिफाइड्सच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेली "साइन अप" लिंक वापरुन एखादा तयार करु शकता आणि "वेबदुनिया मेल साठी साइन अप करा" क्लिक करा.
2. मला माझी इंटरफेस भाषा कशी बदलता येईल?
आपल्या पृष्ठाची इंटरफेस भाषा बदलण्यासाठी, वेबदुनिया क्लासिफाइड्स मुख पृष्ठाच्या उजव्या कोपर्यात उपस्थित असलेल्या टॅब्ज मधून आपल्याला पाहिजे असलेल्या भाषेचा टॅब क्लिक करा.
3. वेबदुनिया क्लासिफाइड्सच्या नियम व अटी काय आहेत? 
4. 21. मी गैरवर्तन, स्पॅम, किंवा लैंगिक सामुग्रीची तक्रार कशी नोंदवू? 
गैर वर्तन, स्पॅम आणि लैंगिक सामुग्रीची तक्रार नोंदवण्यासाठी अस्वीकार्य दिसणार्या सामुग्रीचे वर्णन कारणारा मेल आपण आमच्या classifieds@webdunia.net या कार्यालयीन मेल आयडी वर पाठवा.
जाहिरात पाहात असताना, आपल्याला कोणत्याही अस्वीकार्य डेटाची तक्रार नोंदवायची असल्यास त्या जाहिरात क्षेत्राच्या लगेचच वर असलेल्या गैरवर्तनाची तक्रार नोंदवा टॅब वर क्लिक करा. आपल्याला गैरवर्तनाची तक्रार नोंदवायची असल्यास आपला लॉगिन आयडी आमच्याकडे असणे आवश्यक आहे. जाहिरात अस्वीकार्य असल्याची तक्रार नोंदवायची असल्यास त्यासाठी असलेले कारण निवडा, आपला पडताळणी कोड टाइप करा आणि विनंती सबमिट करा. आपली विनंती प्रशासकाकडे पाठवण्यात येईल, जो ही विनंती मान्य करायची किंवा नाकारायची हे ठरवेल.
5. जर कुणी मला पोस्ट करुन त्रास देत असेल तर मी काय केले पाहिजे?
जर कुणी आपल्याला क्लासिफाइड जाहिरात/टिप्पणी पोस्ट करुन त्रास देत असेल तर, आपल्याला कसा व का त्रास होतो आहे याचे कारण निर्दिष्ट करण्यासाठी, classifieds@webdunia.net येथे संपर्क साधा.
नोट: कृपया आपल्या शहराचे नाव, श्रेणी आणि पोस्टिंगचे शीर्षक नमूद करा, जेणे करून आम्ही त्या जाहिरातीकडे लक्ष देऊ शकू आणि ती जाहिरात ज्या व्यक्तीने पोस्ट केली आहे तिच्याशी संपर्क साधू शकू.